adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यवतमाळ झोनल स्विमिंग स्पर्धेत अकोल्याच्या मास्टर पॉवर स्विमिंग क्लबची दमदार कामगिरी; १६ पदकांची ऐतिहासिक कमाई

 यवतमाळ झोनल स्विमिंग स्पर्धेत अकोल्याच्या मास्टर पॉवर स्विमिंग क्लबची दमदार कामगिरी; १६ पदकांची ऐतिहासिक कमाई  अमोल बावस्कार बुलढाणा (संपाद...

 यवतमाळ झोनल स्विमिंग स्पर्धेत अकोल्याच्या मास्टर पॉवर स्विमिंग क्लबची दमदार कामगिरी; १६ पदकांची ऐतिहासिक कमाई 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यवतमाळ येथे आयोजित झोनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मास्टर पॉवर स्विमिंग क्लबच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १६ पदकांची कमाई केली. विविध वयोगटांतील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके जिंकून अकोला जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा सिद्ध केला.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात रुद्र संजय पवार याने ५० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर फ्री स्टाईल आणि ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात तीन सुवर्णपदके जिंकत स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक नोंदवली.१४ वर्षांखालील मुलांच्या गटात पार्थ राम राठोड याने २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण, तर ५० मीटर व १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदके पटकावली. सक्षम राहुल इंगळे याने २५ मीटर व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण, तसेच १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळवले. अनुज आशिष पनपालिया याने २५ मीटर व ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण आणि २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.१४ वर्षांखालील मुलींच्या गटात लावण्या गणेश कटारे हिने २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण, २५ मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य आणि ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्यपदक जिंकून अकोल्याचे नाव उज्ज्वल केले.१२ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रणव प्रशांत गवई याने २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावत आपल्या उत्कृष्ट कौशल्याची छाप पाडली.या यशामागे एनआयएस (नॅशनल कोच) योगेश अनंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि कठोर प्रशिक्षण असल्याची भावना खेळाडू व पालकांनी व्यक्त केली. त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळेच अकोल्याच्या जलतरणपटूंनी झोनल स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवल्याचे सर्व स्तरांतून गौरव करण्यात येत आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल क्लबचे सदस्य विशाल पोहेकर, प्रमोद खंडारे, सुशील कांबळे, मोहिल खरात, दिनेश वाघ, ज्योती पनपालिया, कविता जावरकर, मनीषा वंजारी, प्रथमेश डोईफोडे, आकाश यादव, गायत्री सरदार, पल्लवी शिंदे, आदित्य थोरात, रामकृष्ण रोहनकर आणि अमन इंगळे यांनी सर्व विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक योगेश पाटील व पालकांचे अभिनंदन केले.

"हा विजय खेळाडूंच्या शिस्तबद्ध सरावाचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि सातत्यपूर्ण मेहनतीचा आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही अकोल्याचे खेळाडू अशीच यशस्वी कामगिरी करतील," असा विश्वास क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला.

झोनल स्पर्धेत १६ पदकांची ऐतिहासिक कमाई करणाऱ्या मास्टर पॉवर स्विमिंग क्लबच्या या यशामुळे अकोला जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments