adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव ते पंढरपूर ४८५ किमी सायकल वारी यशस्वी; कर अधिकारी संदीप गायकवाड यांचा सत्कार विठ्ठल भक्ती, जिद्द आणि शारीरिक तंदुरुस्तीचा प्रेरणादायी संदेश

 जळगाव ते पंढरपूर ४८५ किमी सायकल वारी यशस्वी; कर अधिकारी संदीप गायकवाड यांचा सत्कार विठ्ठल भक्ती, जिद्द आणि शारीरिक तंदुरुस्तीचा प्रेरणादायी...

 जळगाव ते पंढरपूर ४८५ किमी सायकल वारी यशस्वी; कर अधिकारी संदीप गायकवाड यांचा सत्कार

विठ्ठल भक्ती, जिद्द आणि शारीरिक तंदुरुस्तीचा प्रेरणादायी संदेश 


चोपडा  प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरपरिषदेचे कर अधिकारी संदीप गायकवाड यांनी जळगाव ते पंढरपूर हा सुमारे ४८५ किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून विठ्ठल भक्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि जिद्दीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चोपडा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभास नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील, उपनगराध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोलले तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संदीप गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप गायकवाड यांच्या जिद्द, चिकाटी आणि साहसी वृत्तीचे कौतुक करत, जळगाव ते पंढरपूर हा तब्बल ४८५ किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करणे ही अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, शिस्तबद्ध जीवनशैली आणि विठ्ठल भक्तीचा संदेश समाजात पोहोचतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार, नागरिक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संदीप गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्य अधिकारी संजय मिसर, नगर अभियंता दिगंबर वाघ, पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र मोरे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, लेखापाल मयूर शर्मा, लेखापरीक्षक चेतन गडकर, कर निरीक्षक प्रणव पाटील, स्वच्छता निरीक्षक वसंत राठोड, स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे, दीपाली साळुंखे, भांडारपाल महेश जोशी यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments