adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुंबईत भारतीय पत्रकार संघाच्या (एआयजे) १२ व्या राष्ट्रीय वार्षिक महासभेचा दिमाखदार सोहळा २२ राज्यांतील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय संगम; पत्रकार हितासाठी महत्त्वपूर्ण संकल्प, 'एआयजे राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान' प्रदान

  मुंबईत भारतीय पत्रकार संघाच्या (एआयजे) १२ व्या राष्ट्रीय वार्षिक महासभेचा दिमाखदार सोहळा २२ राज्यांतील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय संगम; पत्र...

 मुंबईत भारतीय पत्रकार संघाच्या (एआयजे) १२ व्या राष्ट्रीय वार्षिक महासभेचा दिमाखदार सोहळा

२२ राज्यांतील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय संगम; पत्रकार हितासाठी महत्त्वपूर्ण संकल्प, 'एआयजे राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान' प्रदान 


मुंबई प्रतिनिधी

मुंबई, (दि.२७): "संघटनेची ताकद हीच पत्रकाराचा सन्मान आहे," या ब्रीदवाक्याला साकार करत असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट (एआयजे) – भारतीय पत्रकार संघाची १२ वी राष्ट्रीय वार्षिक महासभा (AGM-2026) रविवारी (दि. २६ जुलै) अंधेरी (पश्चिम), मुंबई येथील नवनीत गुजराती समाज भवन येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडली. या महासभेला देशातील २२ राज्यांतील राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील सुमारे १५० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभल्याने हा सोहळा राष्ट्रीय पत्रकार एकता, पत्रकार कल्याण आणि संघटनात्मक बळकटीचे प्रेरणादायी व्यासपीठ ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. राष्ट्रगीतानंतर राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष तथा आयोजन अध्यक्ष एम. एस. शेख यांनी स्वागतपर भाषण केले. पहिल्या सत्रात महाराष्ट्र राज्याची वार्षिक बैठक, तर दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय कार्यकारिणीची १२ वी वार्षिक महासभा पार पडली. 


महासभेचे अध्यक्षस्थान भूषविताना राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी एआयजे ही केवळ संघटना नसून देशभरातील पत्रकारांचे एक सशक्त राष्ट्रीय कुटुंब असल्याचे सांगितले. पत्रकारांचा सन्मान, सुरक्षा, हक्क आणि स्वाभिमान जपणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार कल्याणासाठी उच्च शिक्षण व आरोग्य सेवांशी संबंधित ३४ सेवा करार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बडवानी येथील संजीवनी हॉस्पिटलशीही सेवा करार करण्यात आला असून, देशातील प्रत्येक जिल्ह्यात अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा संघटनेचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय संरक्षक तथा नवभारत समूहाचे वरिष्ठ संपादक क्रांती चतुर्वेदी यांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा आत्मा असल्याचे सांगत पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष एम. एस. शेख यांनी पत्रकारांचा सन्मान, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य व सामाजिक बांधिलकीसाठी एआयजे सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. राष्ट्रीय संस्थापक संरक्षक जीतू सोनी यांनी २२ राज्यांमध्ये झालेला संघटनेचा विस्तार ही मोठी उपलब्धी असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय महासचिव मनोहर मंडलोई यांनी वार्षिक अहवाल सादर करत पत्रकार हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. 


महाराष्ट्र कार्यवाहक अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी महाराष्ट्रात संघटन विस्तार, पत्रकारांचा सन्मान आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. लीगल विंगचे चेअरमन ॲड. अरिहंत नाहर यांनी प्रत्येक पत्रकाराला कायदेशीर व संवैधानिक मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. महिला विंगच्या अध्यक्षा दीपिका द्विवेदी यांनी महिला पत्रकारांच्या हक्क व नेतृत्व विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. तर हेल्थ अँड एज्युकेशन विंगचे चेअरमन निर्मल सोलंकी यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य व शिक्षण सुविधा अधिक व्यापक करण्यावर भर दिला.

महासभेत पत्रकार सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, विधी सहाय्य आणि संघटन विस्तार यासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष किरण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक सक्षम करण्याची शपथ घेतली. सायंकाळी पत्रकारिता व समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा 'एआयजे राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान' देऊन गौरव करण्यात आला.

या महासभेला राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष एम. एस. शेख व किरण गोगोई, राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, राष्ट्रीय महासचिव मनोहर मंडलोई, राष्ट्रीय संरक्षक क्रांती चतुर्वेदी, संस्थापक संरक्षक जीतू सोनी, राष्ट्रीय संयोजक किशोर दगडी, महाराष्ट्र कार्यवाहक अध्यक्ष सिकंदर नदाफ, प्रदेश महासचिव रमेश गणडे, गोपाल मारवाडी, ॲड. अरिहंत नाहर, दीपिका द्विवेदी, निर्मल सोलंकी, राष्ट्रीय उपाध्यक्ष कल्याण जैन, रविंद्र नेरकर, ध्रुव सिंह, पवन पाठक, मीडिया प्रभारी शाहनवाज शेख, मध्यप्रदेश अध्यक्ष राकेश साहू, कैलाश पठारे यांच्यासह २२ राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तैनूर शेख, वीरेंद्र सिंह ठाकूर, सूरज गौड, रॉकी अग्रवाल, सय्यद बाबू शेख, विकास शिंदे, शोएब मियानूर, आशुतोष पांचोली, सादिक चंदेरी, आशीष वाणी, रश्मी पटेल, अजय यादव, मोहम्मद रफीक खान, अंकित सिंह यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी सिकंदर नदाफ यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रीय एकात्मता, पत्रकार हित आणि संघटन बळकटीचा दृढ संकल्प व्यक्त करत सामूहिक भोजनानंतर महासभेची सांगता झाली.

No comments