adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही", "No Return – No Exchange" अट लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे निर्देश माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या तक्रारीची दखल; विभागीय आयुक्त कार्यालयाचे सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश

 "एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही", "No Return – No Exchange"  अट लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे निर्देश माहिती अ...

 "एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही", "No Return – No Exchange" अट लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे निर्देश

माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या तक्रारीची दखल; विभागीय आयुक्त कार्यालयाचे सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश 


जळगाव प्रतिनिधी :

संपादक हेमकांत गायकवाड 

ग्राहकांना "एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही", "No Return – No Exchange" अशा अटी लावून त्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या दुकानदारांविरोधात चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ मधील कलम २(४७) नुसार ग्राहकांच्या हक्कांवर मर्यादा आणणाऱ्या अथवा त्यांना अन्यायकारक अटी लादणाऱ्या व्यावसायिक पद्धतींना 'अन्यायकारक व्यापार पद्धती' (Unfair Trade Practice) मानले जाते. त्यामुळे "No Return – No Exchange" सारख्या अटी कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विषय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांच्या बैठकीत मांडून व्यापारी संघटनांना ग्राहक कायद्याबाबत आवश्यक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, अशा प्रकरणांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेशही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण भूमिका घेतली असून, या निर्णयामुळे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments