adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

​अहिल्यानगरमध्ये खळबळ..! स्कोडा कारमधून चालली होती भयंकर डील;​मोक्का लागलेला कुख्यात गुंड ५ गावठी कट्ट्यांसह 'एलसीबी' ने केला जेरबंद

  ​अहिल्यानगरमध्ये खळबळ..! स्कोडा कारमधून चालली होती भयंकर डील;​मोक्का लागलेला  कुख्यात गुंड ५ गावठी कट्ट्यांसह 'एलसीबी' ने केला जेर...

 ​अहिल्यानगरमध्ये खळबळ..! स्कोडा कारमधून चालली होती भयंकर डील;​मोक्का लागलेला  कुख्यात गुंड ५ गावठी कट्ट्यांसह 'एलसीबी' ने केला जेरबंद  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.शेंडी बायपास परिसरात विक्रीसाठी आणलेल्या ५ गावठी पिस्टलसह अग्निशस्त्रे) दोन आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली असून,एक आरोपी फरार झाला आहे. पोलिसांच्या या कारवाईत एकूण १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.सदर आदेशानुसार पोलीस पथक दि. १९/०७/२०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त घालत असताना,त्यांना गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली.

​भाऊ आनंदा रसाळ (रा. रसाळवाडी,निघोज,ता. पारनेर) व बंटी उर्फ स्वप्निल बिभीषण पाबळे (रा.कावळ पिंपरी,ता.जुन्नर,जि.पुणे) हे दोघे त्यांच्या कब्जात गावठी कट्टे बाळगून,त्यांची विक्री करण्यासाठी एम.आय.डी.सी डेअरी चौक ते शेंडी बायपास जाणाऱ्या रोडवर एका सिलव्हर रंगाच्या कारसह थांबलेले आहेत,अशी माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने वडगाव गुप्ता शिवारात छापा टाकून दोन इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची नावे

१) पिंटु उर्फ भाऊ आनंदा रसाळ (वय- ४० वर्षे, रा. रसाळवाडी, निघोज, ता. पारनेर, जि.अहिल्यानगर)

२) बंटी उर्फ स्वप्निल बिभीषण पाबळे (वय- ३० वर्षे, रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आहेत.​अटक करण्यात आलेल्या आरोपींची आणि त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना

​२,५०,०००/- रुपये किमतीचे ०५ गावठी पिस्टल (अग्निशस्त्रे)

​४०,०००/- रुपये किमतीचे ०२ मोबाईल

​८,००,०००/- रुपये किमतीची एक स्कोडा कंपनीची चारचाकी वाहन असा 

​एकूण १०,९०,०००/- रुपये. किमतीचा मुद्देमाल मिळून आला.​आरोपी भाऊ आनंदा रसाळ याने चौकशी दरम्यान सांगितले की,जप्त केलेले अग्निशस्त्र त्याने आरोपी भैय्या उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले (रा.ता.जि.धाराशिव - फरार) याच्याकडून खरेदी करून विक्रीसाठी आणले होते.बंटी उर्फ स्वप्निल बिभीषण पाबळे याने जप्त केलेली स्कोडा कार स्वतःची असल्याचे सांगितले. आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी साथीदारांसह एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(२), ३५२, ३५१(३), १४०(३), ११८(२), ३२४(४), ३(५) व आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.आरोपी पिंटु उर्फ भाऊ आनंदा रसाळ (अट्टल गुन्हेगार) या आरोपीवर अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यामध्ये खून,खुनाचा प्रयत्न,दंगा करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी भैय्या उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले (फरार आरोपी):या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खून,खुनाचा प्रयत्न,दंगा करणे या सदराखाली गुन्हे दाखल आहेत.​ताब्यातील आरोपीं विरुद्ध पोकॉ/२५७४ मनोज मोहन साखरे (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५५/२०२६ आर्म ऍ़क्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची धडक कारवाई श्री.मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि.अनंत सालगुडे,कृष्णकुमार सेदवड, पोलीस अंमलदार अतुल लोटके,गणेश लोंढे,राहुल द्वारके,शाहिद शेख,किशोर शिरसाठ,मनोज साखरे,रोहित येमुल,प्रशांत राठोड,प्रकाश मांडगे आणि चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

No comments