तब्बल ३१ लाखांचे ड्रग्ज, खेळण्यातील पिस्तूल आणि मुखवटे जप्त तोफखाना पोलिसांनी उधळला टोळीचा मोठा कट! सचिन मोकळं अहिल्यानगर संपादक हेमकां...
तब्बल ३१ लाखांचे ड्रग्ज, खेळण्यातील पिस्तूल आणि मुखवटे जप्त तोफखाना पोलिसांनी उधळला टोळीचा मोठा कट!
सचिन मोकळं अहिल्यानगर
संपादक हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- शहर परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्त घालत असताना तोफखाना पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणारी आणि दरोड्याच्या तयारीत असलेली एक मोठी टोळी जेरबंद केली आहे.पोलिसांच्या या धडक कारवाईत तब्बल ३१ लाख ४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज आणि इतर घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.दि.१९/०७/२०२६ रोजी सायंकाळी अहिल्यानगर शहरातील मिस्कीन मळा, तारकपूर परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी तोफखाना पोलीस पथक गस्त घालत असताना त्यांना एक विना नंबरची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार व तिच्यामध्ये पाच इसम संशयीतरित्या फिरत असलेले दिसले.त्यावरुन पोलीस पथकाने त्यांच्याकडे विचारपूस करत असतांना ५ इसमा पैकी दोन इसम पळून गेले व उर्वरीत तीन इसम कारसह पळून जात असतांना त्यांचा पाठलाग करुन त्यांना तोफखाना पोलीस ठाणे समोरील रोडवर थांबवून त्यांना कारसह तोफखाना पोलीस ठाणे येथे आणले.त्यांना त्यांचे नाव पत्त्या बाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचे नावे:
१) जिशान शौकत सय्यद,वय २६ वर्षे,रा.मुकुंदनगर, सहारा कॉलनी, ता.जि.अहिल्यानगर
२) रिहान जावेद शेख, वय २६ वर्षे, रा. छोटी मरीयम मस्जिदजवळ, मुकुंदनगर, ता.जि.अहिल्यानगर
३) वासिम खलील बागवान, वय ३८ वर्षे, रा.पिंजार गल्ली, ता.जि.अहिल्यानगर असे सांगितले असून पळून गेलेले इसमांची नावे
४) जमीर निसार शेख रा. मुकुंदनगर व
५) एक अनोळखी इसम असे सांगितले.त्यानंतर आरोपी क्र. १ ते ३ यांची व त्यांचे ताब्यातील कारची सरकारी पंचासमक्ष,नायब तहसिलदार गणेश भानवसे व पोनि.श्री. बालाजी वैद्य यांनी झडती घेतली असता त्यांचे ताब्यात प्लॅस्टिक पिशवी व प्लॅस्टिक डबी मध्ये ३१,०४,४००/- रु. किमतीचे जवळ जवळ १५० ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ,स्प्रे,खेळण्याचा प्लॅस्टिक पिस्तूल (लाईटरगन), इंजेक्शन सिरीज,रबरी चेह-याचे मुखवटे,चेहरा झाकला जाईल असे मास्क, हॅन्डग्तोज,सुताची दोरी, गाडीच्या नंबर प्लेट,चाकू असे या वस्तू मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध पोकॉ.सतिश त्रिभूवन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस ठाणे गु रं नं ६१२/२०२६ बी एन एस ३१०(४), ३१०(५), ३१३ सह आर्म ॲक्ट ४/२५ सह गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २२(क) प्रमाणे गुन्हा दि. २०/०७/२०२६ रोजी दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री.मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे,अपर पोलीस अधीक्षक,श्री.दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर भाग यांचे मार्गदर्शन व सूचना प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि.श्री बालाजी वैद्य,पोसई. योगेश चाहेर,पोउपनिरी. परशुराम दळवी,पोहेकॉ.नितीन उगलमुगले,दिनेश मोरे, भानुदास खेडकर,सुधीर खाडे, अब्दुलकादर इनामदार,पोकॉ. सुमित गवळी,सतीश त्रिभूवन, सुजय हिवाळे,शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे,सतिश शिंदे,कपील गायकवाड,जिजा खुडे,कल्पना अवसरे,होमगार्ड शुभम खुडे सर्व नेम.तोफखाना पोलीस स्टेशनचे व पोहेकॉ. दिपक जाधव,नेम.एमआयडीसी पो स्टे यांनी केली आहे.

No comments