adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घाडवेल येथे ३४ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात संपन्न

 घाडवेल येथे ३४ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात संपन्न  अशोक कोळी चोपडा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा विधानसभा मतद...

 घाडवेल येथे ३४ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात संपन्न 


अशोक कोळी चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या घाडवेल येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी (दि. १९ जुलै २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.व चोपड्याचे लोक नियुक्त नगर अध्यक्षा सौ , नम्रता सचिन पाटील , विकास पाटील रवि पाटिल अनु ठाकुर अशोक कोळी गजानन पाटील ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील संतोष पाटिल उपसरपंच प्रेमचंद पाटिल वसंत पाटिल राजू पाटिल गावातील नागरिक,व तरुण मंडळी पदाधिकारी, महिला, युवक तसेच शिवसेना कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी घाडवेल गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या स्मशानभूमी येथे सांत्वन शेड बांधकामासाठी १० लाख रुपये निधीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच २४ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण करण्यात आले. या दोन्ही विकासकामांमुळे गावातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम होणार असून स्मशानभूमीत नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमा दरम्यान मराठी शाळेचे  शिक्षक  व शाळेच्या संपूर्ण स्टॉप उपस्थित होते आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. उपस्थितांनी विकासकामांचे स्वागत करत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.

No comments