adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर च्या भोकर नदी पुराच्या पाण्यात युवक वाहून बेपत्ता ! रावेर पोलीसांचे शोधकार्य सुरू.

 रावेर च्या भोकर नदी पुराच्या पाण्यात युवक वाहून बेपत्ता ! रावेर पोलीसांचे शोधकार्य सुरू.  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत ...

 रावेर च्या भोकर नदी पुराच्या पाण्यात युवक वाहून बेपत्ता !

रावेर पोलीसांचे शोधकार्य सुरू. 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील भोकरी गावातील भोकर नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पुराचे पाण्यात बोरखेडा तालुका रावेर येथील युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना दि ३१ जुलै रोजी सायंकाळी ४वाजेच्या दरम्यान घडली आहे पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता झालेल्या युवकाचे नांव  


शिवा केशरम लिंगवले वय 28 वर्षे राहणार बोरखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव असे आहे शिवा केशराम लिंगवले हा दिनांक 31/07/2026 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास रावेर येथून बाजार करून पायी बोरखेडा गावी जात असताना बोरखेडा गावाचे जवळ असलेल्या भोकरी नदीचे पुलावरून पुराचे पाणी वाहत होते या पाण्यातून जात असतांना सदर युवक पाण्यात वाहून गेला आहे या घटनेची माहिती रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील याना मिळाल्यानंतर लगेच तातडीने पोलीस सहकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांच्या मदतीने युध्दपातळीवर शोधकार्य सुरू केले आहे. कृपया कोणाला काही माहिती मिळाल्यास रावेर पो स्टे ला माहिती देण्याचे आवाहन रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे 


No comments