adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हिंदूंनी ‘स्वबोध’ व ‘शत्रुबोध’ जागृत ठेवून देश-धर्म रक्षणासाठी संघटित व्हावे! सौ.सुवर्णाताई साळुंखे सनातन संस्थेचे अनिल पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटाचे ईश्वर अलकारी नगरसेवक (न.प.चोपडा) यांचा सत्कार

हिंदूंनी ‘स्वबोध’ व ‘शत्रुबोध’ जागृत ठेवून देश-धर्म रक्षणासाठी संघटित व्हावे! सौ.सुवर्णाताई साळुंखे सनातन संस्थेचे अनिल पाटील यांच्या हस्ते ...

हिंदूंनी ‘स्वबोध’ व ‘शत्रुबोध’ जागृत ठेवून देश-धर्म रक्षणासाठी संघटित व्हावे! सौ.सुवर्णाताई साळुंखे


सनातन संस्थेचे अनिल पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटाचे ईश्वर अलकारी नगरसेवक (न.प.चोपडा) यांचा सत्कार 



चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

‘‘आज देश आणि धर्मावर होणारे आघात केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन धडकले आहेत. आतंकवाद आणि घुसखोरी यांच्या जोडीलाच ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘वक्फ बोर्डाचे अतिक्रमण’ आणि अलीकडेच उघडकीस आलेला ‘कॉर्पोरेट जिहाद’ अशा विविध अघात अन् षड्यंत्रांद्वारे हिंदूंना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. यातून देशाचा भूराजकीय नकाशा, तसेच लोकसंख्या वाढीचे गणित बदलण्याचे भयंकर कारस्थान रचले जात आहे. जोपर्यंत हिंदू समाज स्वतःचा ‘स्वबोध’ (सामर्थ्य आणि धर्मज्ञान) अन् ‘शत्रुबोध’ (शत्रूची छूपी रणनीती) जागृत करत नाही, तोपर्यंत या चौफेर आघातांचा प्रतिकार करणे शक्य नाही. त्यामुळे हिंदूंनी आता केवळ बघ्याची भूमिका न घेता देश-धर्मरक्षणासाठी कृतीशील व्हावे’’, असे परखड विचार जळगांव येथील सनातन संस्थेचे सौ.सुवर्णाताई साळुंखे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रवचनात मांडले. ते चोपडा येथील कृष्ण मंदिराजवळील यज्ञ वैकल्य मंडळ हॉल येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव प्रसंगी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि साधनेची दिशा’ या विषयावर बोलत होते. यावेळी राष्ट्र व धर्म कार्यासाठी त्याग करणाऱ्या चोपडा येथील हिंदुत्ववादी भाजपा नगरसेवक शरद पाटील,शिवसेना शिंदे गटाचे ईश्वर अलकारी यांचा सत्कार सनातन संस्थेचे भगतसिंग पाटील अनिल पाटील यांनी केला

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै या दिवशी देशभरात ६४ ठिकाणी तर जळगाव, पाळधी, खर्ची चोपडा या ४ ठिकाणी 'गुरुपौर्णिमा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले.आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता, हिंदूंनी प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.




सर्व ठिकाणच्या महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचन, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, ‘समिती’चे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट दाखवण्यात आला. या महोत्सवात विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याचा अनेकांनी लाभ घेतला यावेळी हिंदुत्ववादी श्याम परदेशी,गोविंद मराठे,ज्योती वारके यासह असंख्य श्रोते उपस्थित होते.सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन राजेंद्र बारी यांनी केले. तर सूत्रसंचालन सुधाकर चौधरी यांनी केले.

No comments