गणेश दृष्टी हिन संस्थेतर्फे आज चोपड्यात ऑर्केस्ट्राचे आयोजन चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- गणेश दृष्टी हिन ब...
गणेश दृष्टी हिन संस्थेतर्फे आज चोपड्यात ऑर्केस्ट्राचे आयोजन
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- गणेश दृष्टी हिन बहुउद्देशीय विकास संस्था धुळे यांच्या वतीने तालुक्यातील अंध बांधवांसाठी व दृष्टी हिनांसाठी अंध कलाकारांच्या माध्यमातून ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दृष्टी असलेल्या डोळस बांधवांनी उपस्थिती द्यावी असे असे आवाहन अध्यक्ष विकास पगारे, उपाध्यक्ष दिनेश राठोड, व सचिव राजेश पगारे यांनी केले आहे. अंध बांधवांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम असून यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन एक दिवस अंधांसाठी खर्च करावा असेही आव्हान पत्रकात करण्यात आले आहे. आमची ही संस्था विना अनुदानित असून या संस्थेला मदत म्हणजे एक पुण्य कर्मच आहे असा भाव मनात ठेवून डोळस बंधू भगिनींनी आम्हाला मदत करावी असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. आज दिनांक 25 रोजी सायंकाळी सात वाजता चोपडा नगर परिषदेच्या नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती द्यावी असे आवाहन पगारे यांनी केले आहे
No comments