विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य! ( लातूर उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लातूर:- डिगोळ येथील लातूर–उदगीर राष्...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य!
( लातूर उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर:- डिगोळ येथील लातूर–उदगीर राष्ट्रीय महामार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडून शाळेत ये-जा करावी लागत आहे. ही अत्यंत गंभीर बाब लक्षात घेऊन डिगोळ येथे राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक, आवश्यक सूचना व इशारा फलक तात्काळ बसविण्यात यावेत, तसेच डिगोळ, येरोळ मोड व चामरगा येथे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे उभारण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी आज लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. भारत बास्टेवाड साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी मा.जिल्हाधिकारी साहेबांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत लवकरच योग्य निर्णय घेऊन आवश्यक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments