फत्तेपूर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गनी तडवी यांचा गौरवपत्र देऊन सन्मान रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फत्...
फत्तेपूर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गनी तडवी यांचा गौरवपत्र देऊन सन्मान
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फत्तेपुर पोलीस स्टेशनचे हद्दीतील लूट, चोरी, दरोडा यासह विविध गुन्ह्यातील तपास यशस्वीपणे पूर्ण करून जळगाव पोलीस दलाने जो मुद्देमाल हस्तगत केला होता तो मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. फत्तेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या महिलेवरील सामुहिक अत्याचार प्रकरणाच्या गुन्ह्यातील पंधरा आरोपींपैकी चौदा आरोपींना देऊळगावगुजरी येथून अटक करण्यात आली होती तर मुख्य आरोपीला मोताळा जि. बुलडाणा येथून अटक करण्याची यशस्वी कामगिरी पोलिसांनी केली होती. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव व हेड काँ. गणी तडवी यांना या विशेष कामगिरीबद्दल पोलीस दलातर्फे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते प्रशंसा पत्र देऊन सन्मानित केले. पोहे कॉ गनी तडवी यांना जिल्ह्यातील तीन मंत्री महोदयांनी गौरव पत्र प्रदान करुन सन्मानित केले बद्दल गनी तडवी यांचे आदिवासी तडवी भिल समाजातील सामाजिक संघटना तसेच समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे गनी तडवी यांनी यापूर्वी जळगांव जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावलेले आहे

No comments