adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात स्व अजित दादा पवार यांची जयंती साजरी...

 यावल महाविद्यालयात स्व अजित दादा पवार यांची जयंती साजरी... भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह ...

 यावल महाविद्यालयात स्व अजित दादा पवार यांची जयंती साजरी...


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ एस आर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, उपप्राचार्य प्रा हेमंत भंगाळे विचारमंचावर उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांनी अजित दादा पवार यांची राजकीय कारकीर्दीवर थोडक्यात प्रकाश टाकून त्यांच्या वैयक्तिक जीवनपट उलगडून दाखवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस आर गायकवाड यांनी देखील अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.. सुत्रसंचलन इतिहास विभागाचे प्रा डॉ संतोष जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठी विभागाचे प्रा रत्नाकर कोळी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

No comments