adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी डॉ निलेश गडे व सौ स्विटी बेंडाळे

 यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी डॉ निलेश गडे व सौ स्विटी बेंडाळे  भरत कोळी यावल संपादक हेमकांत गायकवाड  यावल : येथील कृषी उत्पन...

 यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी डॉ निलेश गडे व सौ स्विटी बेंडाळे 


भरत कोळी यावल

संपादक हेमकांत गायकवाड 

यावल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदार संघ आणि ग्रामपंचायत मतदार संघ मधील दोन । संचालक जागा रिक्त होत्या या रिक्त जागांच्या ठिकाणी नव्याने दोन संचालकांच्या नियुक्तीसाठी संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याकडेमार्गदर्शन तत्वे व धरण्यासाठी माहिती मागवली होती त्यानुसार संचालक मंडळाने रिक्त जागी दोन जागा भरण्याची प्रस्ताव तयार करून पाठविले.

ग्रामपंचायत मतदार संघातील एका संचालकाचा दुर्दैवी निधन झाले त्या रिक्त जागी त्यांच्या गावातील म्हणजे नावी तालुका यावल येथील माजी संचालकउमेश बेंडाळे यांच्या पत्नी उमेश बेंडाळे ग्रामपंचायत सदस्य न्हावी यांची तर व्यापारी मतदारसंघातील एका संचालकाने नूतनीकरण न केल्याने अपात्र ठरविण्यात आले होते या रिक्त जागी डॉ. निलेश गडे यांची नियुक्ती संदर्भात प्रस्ताव संचालक मंडळाने केला व त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आल्यामुळे या दोघा संचालकांची नियुक्तीचा ठराव करण्यात आला असून तसा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याकडे संस्थेतर्फे पाठवण्यात आल्याचे मासिक मीटिंगमध्ये सांगण्यात आले. या मिटींगचे अध्यक्षस्थानी सभापती उज्जैन भाऊ राजपूत पाटील हे होते तर यावेळी प्रस्ताविक हर्षल भाऊ पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन माजी सभापती राकेश फेगडे यांनी केले. नवनिर्वाचित दोन्ही संचालकांचे संस्थेतर्फे व त्यांच्या चाहत्या तर्फे कृषी बाजार समितीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह युतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन केले.

No comments