उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. लातूर, जि, प्र, (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा : शिवसे...
उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश.
लातूर, जि, प्र, (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा : शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कार्याने प्रभावित होऊन मदनसुरी येथील उबाठा गटाचे शाखाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि. 15 जुलै 2026 रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते व उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. उबाठा गटाचे मदनसुरी गावचे शाखाप्रमुख वरून जाधव, अरविंद कारभारी सिद्धाजी माने, प्रताप सूर्यवंशी, लारा इटकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा परिषद मदनसुरी गटाच्या सदस्या तथा आरोग्य व पशुसंवर्धन समितीच्या सदस्य सौ. शरयू माने, गावचे माजी सरपंच अशोकराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव, दिलीप जाधव, माधव शिंदे, गोविंद माने, अशोक सूर्यवंशी, सचिन जाधव, आकाश शिंदे, राम माने, व्यंकट राजे, तानाजी माने, शहाजी माने, नवनाथ सोळंके तसेच बाल शिवसैनिक प्रणित संभाजी माने उपस्थित होते. याच प्रसंगी मदनसुरी गावचे ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक अजित अतुल जाधव यांचा वाढदिवस शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा देऊन त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी नवप्रवेशित सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले व आगामी निवडणुकीत शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments