adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेत सहभागी व्हा!आपला सहभाग आपली जबाबदारी !

 मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेत सहभागी व्हा!आपला सहभाग आपली जबाबदारी !  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकव...

 मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेत सहभागी व्हा!आपला सहभाग आपली जबाबदारी ! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून, लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. याच अनुषंगाने आज SIR प्रक्रियेचा फॉर्म भरून आवश्यक माहिती अद्ययावत केली. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद असणे हा सुदृढ लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली माहिती वेळेत पडताळून आवश्यक दुरुस्ती करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अचूक मतदार यादीमुळेच निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना मनापासून आवाहन करतो की, आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराची माहिती तपासा, आवश्यक असल्यास फॉर्म भरून मतदार यादी अद्ययावत करा आणि लोकशाही बळकटीकरणाच्या या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवा. बीएलओ मकबुल रमजान तडवी सर, अंकुश महाजन सर, मेहरबान तडवी सर, अमित सिरसाठ, नजरुल इस्लाम,  अब्दूलजलील दोसमोहंमद, तर शिवसेना पक्षाचे राजेंद्र सावळे, बीएलए उत्तम वाघ, मुस्तफा मलक, मुबारक उर्फ राजू तडवी.विकास वाघ, सलीम तडवी, सुरेंद्र शिरनामे, जावेद रमजान तडवी आदिंचा सहभाग होता

No comments