यावल तालुका आदिवासी दिन उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर; ९ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्धार भरत कोळी यावल (संपादक...
यावल तालुका आदिवासी दिन उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर; ९ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्धार
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येत्या ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर यावल शेतकी संघाच्या सभागृहात आदिवासी टोकरे, ढोर, महादेव व मल्हार कोळी समाज बांधवांची बैठक ज्येष्ठ समाजनेते प्रभाकर आप्पा सोनवणे (वढोदेकर) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत आदिवासी दिन उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करून कार्यक्रमाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी समाजबांधवांना कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करण्याचे तसेच ९ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बैठकीत जितेंद्र सपकाळे, रोहन सोनवणे (जळगाव), हरलाल कोळी (रावेर) आणि नामदेव कोळी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भालोद येथील सरपंच प्रदीप कोळी, उपाध्यक्षपदी निकिता कोळी (फैजपूर) व दीपक कोळी (यावल), खजिनदारपदी खेमचंद कोळी, तर प्रसिद्धी प्रमुखपदी गोकुळ कोळी यांची निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून नितीन कोळी (रावेर), मुरलीधर कोळी (भुसावळ), राज पाटील (भुसावळ), भागवत कोळी (तांदळवाडी), किरण कोळी (तासखेडा), नितीन कोळी (दहिगाव), वाल्मीक कोळी (राजोरा), धनराज कोळी (यावल), कैलास सपकाळे (अंजाळे), दीपक कोळी (किनगाव), कुणाल सोनवणे (बामणोद), शांताराम इंगळे (चोपडा), नितीन कोळी (अंजाळे), रोहिदास कोळी (पिंप्री), भागवत कोळी (अंजाळे), महेश नन्नवरे (यावल), नामदेव कोळी (पाडळसा), गोपाळ कोळी (यावल) आणि भरत कोळी (यावल) यांची निवड करण्यात आली. बैठकीस यावल तालुक्यातील प्रवीण कोळी, संदीप सोनवणे, प्रकाश कोळी, पद्माकर कोळी, अनिल कोळी, नितीन कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
येत्या ९ ऑगस्ट रोजी रेणुका देवी मंदिर, यावल येथून विविध पारंपरिक वेशभूषा, सजीव देखावे आणि आदिवासी पारंपरिक नृत्यांच्या माध्यमातून भव्य रॅली काढण्यात येणार असून ती आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत जाणार आहे. या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने ज्येष्ठ समाजनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेमचंद कोळी यांनी केले, तर नितीन सपकाळे यांनी आभार मानले.


No comments