विभागीय आयुक्तांची सातपुडा जंगल सफारी, वृक्षारोपण करीत 'हरित महाराष्ट्र' अभियानाचा शुभारंभ रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपाद...
विभागीय आयुक्तांची सातपुडा जंगल सफारी, वृक्षारोपण करीत 'हरित महाराष्ट्र' अभियानाचा शुभारंभ
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगा मधील पर्यटनासाठी प्रसिद्ध पाल जंगलात नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम यांनी यावल वनविभागांतर्गत सातपुडा जंगल सफारी पाल येथे भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास व वनसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांचा आढावा घेतला
विभागीय आयुक्तांच्या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान त्यांनी दि ३जुलै रोजी दौऱ्यात
पाल उद्यानाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला.
• जंगल सफारीतील कक्ष क्रमांक २५ व ३० मधील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
• पर्यटकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या विविध सुविधा व सोयींची तपासणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
• महाराष्ट्र शासनातर्फे घोषित करण्यात आलेल्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
• वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश वृक्षारोपण कार्यक्रम राबवून देण्यात आला.
वनविभाग वनव्यवस्थापन वनसंपदा संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासन विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत असून सातपुडा जंगल सफारी हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे ते म्हणाले
या दरम्यान परिसरात उपस्थित मान्यवरांनी वन महोत्सव मोहीमेअंतर्गत नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे, सहाय्यक उपवनसंरक्षक समाधान पाटील तहसीलदार दिपा जेधे,वन विभागाचे शितल नगराळे, प्रदीप काळे आदिंसह उपस्थितांनी वृक्षारोपण केले व हरित महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ केला


No comments