चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनतर्फे ९६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जागतिक लोकशा...
चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनतर्फे ९६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जागतिक लोकशाही दिनानिमित्त चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या "एक पुस्तक दान करा, अनोखे अभिवादन करा" या सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमामध्ये नागरिकांकडून वही, पुस्तके, पेन तसेच इतर शैक्षणिक साहित्य दानस्वरूपात संकलित केले जाते. संकलित साहित्य आदिवासी शाळा, आदिवासी पाडे, अनाथ आश्रम, वस्तीगृहे, जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणांतील गरजू विद्यार्थ्यांना भेटस्वरूपात वितरित केले जाते.
यावर्षी श्री संत गाडगे महाराज वसतिगृह, गडकरी नगर तसेच समता नगर, भुसावळ येथील वसतिगृहात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ९६ विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, स्केल, १०० पानांची व २०० पानांची रजिस्टर तसेच कंपास बॉक्स यांसह विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकी मेश्राम, समाजसेवक मुन्ना ठाकूर, आनंद हूसळे, दीक्षा मेश्राम, कमलाकर अडकमोल, सागर रामटेके यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या वतीने समाजातील दानशूर नागरिकांनी शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.


No comments