adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप

 आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप  तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर  (संपादक -:- ‌हेमकांत गायकवाड) आषाढी एकादशीच्या...

 आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप 


तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर 

(संपादक -:- ‌हेमकांत गायकवाड)

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कठोरा फाट्याजवळ चितोडा गावातील ग्रामस्थांच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वारकरी संप्रदायाची सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आला. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसह परिसरातील भाविकांना प्रेमपूर्वक अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात चितोडा गावातील ग्रामस्थ तसेच सांगवी बुद्रुक, कठोरा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत नियोजन, व्यवस्था आणि वाटपाची जबाबदारी पार पाडली. सेवा, समर्पण आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. यावेळी उपस्थित भाविकांनी आयोजकांचे आभार व्यक्त करत, अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात परस्पर सहकार्य, मानवता आणि भक्तीभाव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. दरवर्षी सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी उदाहरण मानला जात आहे.

No comments