आषाढी एकादशीचे औचित्य साधत अंतुर्लीत जय शिवाजी दुर्गा मंडळाकडून वृक्षारोपण अंतुर्ली : किरण धायले (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आषाढी एकादश...
आषाढी एकादशीचे औचित्य साधत अंतुर्लीत जय शिवाजी दुर्गा मंडळाकडून वृक्षारोपण
अंतुर्ली : किरण धायले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील शिवाजीनगर परिसरात जय शिवाजी दुर्गा मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.
पर्यावरणाचा समतोल राखणे, वाढते प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढीला हिरवाईची अमूल्य भेट देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. धार्मिक परंपरेसोबत सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

No comments