वरुड - भूमी अभिलेख विभागाच्या प्रश्नांवर महादेवराव कडू यांचे आमरण उपोषण मागे प्रशासनाच्या आश्वासनानंतर झाली उपोषणाची सांगता वरुड (जि.अमर...
वरुड - भूमी अभिलेख विभागाच्या प्रश्नांवर महादेवराव कडू यांचे आमरण उपोषण मागे
प्रशासनाच्या आश्वासनानंतर झाली उपोषणाची सांगता
वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वरुड तहसील कार्यालयासमोर भूमी अभिलेख विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत श्री.महादेवराव कडू यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली. तहसीलदार तसेच भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या व योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर श्री. कडू यांनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी तहसीलदार, श्री शेळके व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच वरुड नगर परिषद भाजपाच्या नगरसेविका सौ.ज्योती दुर्गादास शेगेकर, गट नेते किरण सावरकर, बांधकाम सभापती जीवन मालपे, नगरसेवक गौरव इंगळे, संदीप देवते, नितेश धुर्वे, योगेश्वर खासबागे, राहुल आगरकर, प्रविण सावरकर तसेच भाजप पदाधिकारी नरेंद्र उपरकर, दुर्गादास शेगेकर, मुरलीधर पवार, गौरव सुपले प्रकाश माळोदे, पत्रकार निखिल बावणे व नरेश टाकरखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. महादेवराव कडू यांना निंबूपाणी पाजून आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर
वरुड जि.अमरावती
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments