चोपडा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने SIR प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : दिनांक 0...
चोपडा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने SIR प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : दिनांक 02/07/2026 गुरुवार रोजी ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली चोपडा येथे SIR प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविणे तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना SIR प्रक्रियेबाबत सखोल माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील, चोपडा साखर कारखाना माजी चेअरमन मा . दादासाहेब डॉ सुरेश पाटील,रावेर लोकसभा काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, जळगाव महानगर अध्यक्ष जमील शेख, मा.ताईसाहेब डॉ सौ स्मिताताई संदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष अजबराव पाटील ,प्रशांत पाटील तसेच सी. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून नियुक्त प्रशिक्षक ॲड. शहजाद खान आणि ॲड. महोतशम रजा यांनी SIR प्रक्रियेचे महत्त्व, मतदार यादीची अचूकता, बूथस्तरावरील जबाबदाऱ्या आणि संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घ्यावयाची काळजी तसेच SIR प्रक्रियेतील विविध बाबी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्याची पद्धत, मतदार यादी पडताळणी तसेच प्रत्यक्ष कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शंकांचे निरसन केले.
या प्रशिक्षणामुळे चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना SIR प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली असून आगामी काळात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
तसेच चोपडाचे मा. तहसीलदार साहेब भाऊसाहेब थोरात व नायब तहसीलदार योगेश पाटील यांनीही प्रशिक्षण कार्यक्रमास सदिच्छा भेट देत उपस्थितांना SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेचे महत्त्व, मतदार यादी अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता तसेच निवडणूक आयोगाच्या विविध तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विविध राजकीय पक्षांच्या बीएलए बैठका, कार्यकर्त्यांच्या सभा तसेच इतर जनजागृती कार्यक्रमांमध्ये ज्या पद्धतीने SIR संदर्भातील माहिती दिली जाते, त्याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या या प्रशिक्षण कार्यक्रमातही त्यांनी उपस्थित राहून आवश्यक माहिती दिली.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजीव सोनवणे शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे , एस डी पाटील, नगरसेवक रमाकांत ठाकूर, अमोल पाटील, वंदना पाटील ,वंदना बाविस्कर तसेच कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

No comments