एसआयआर जनजागृती अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे – शहरप्रमुख पिंटू मंडवाले यांचे आवाहन मतदार यादीत नाव कायम राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वे...
एसआयआर जनजागृती अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे – शहरप्रमुख पिंटू मंडवाले यांचे आवाहन
मतदार यादीत नाव कायम राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करण्याचे नागरिकांना आवाहन
इदू पिंजारी | फैजपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर : राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना (शिंदे गट) फैजपूर शहरप्रमुख किरण प्रकाश मंडवाले (पिंटू मंडवाले) यांनी केले आहे.
मतदारांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची छायाप्रत, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याकडे वेळेत जमा करावीत. कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास मतदार यादीतील नावाबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक विभागाने नियुक्त केलेल्या बीएलओंनी घराघरात जाऊन मतदारांची माहिती अद्ययावत करून आवश्यक अर्ज भरून घ्यावेत. कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी बीएलओंनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असेही मंडवाले यांनी नमूद केले.
फैजपूर शहरातील कोणत्याही मतदाराला अर्ज भरणे किंवा आवश्यक प्रक्रियेसंदर्भात अडचण असल्यास त्यांनी 8329252591 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments