वृक्षारोपणातून स्वर्गीय माणिकराव नामदेवराव (निकम) पाटील यांना अनोखी श्रद्धांजली पारंपरिक अस्थी विसर्जनाऐवजी स्मशानभूमीत वृक्षारोपण करून दि...
वृक्षारोपणातून स्वर्गीय माणिकराव नामदेवराव (निकम) पाटील यांना अनोखी श्रद्धांजली
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर किरण धायले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली येथील स्वर्गीय दादासो. माणिकराव नामदेवराव (निकम) पाटील यांचे दि. २० जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी तृतीय स्मृतिविधीच्या निमित्ताने कुटुंबीयांनी सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला.
पारंपरिक पद्धतीने अस्थी विसर्जन करण्याऐवजी त्यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत स्वर्गीय माणिकराव पाटील यांना अनोखी आणि अर्थपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लावण्यात आलेला वृक्ष त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्याबरोबरच पुढील पिढ्यांसाठी निसर्गाचे अमूल्य वरदान ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी कृषिरत्न दिनेश पाटील, प्रकाश किसन बकाल, सुनील माणिकराव पाटील, अनिल माणिकराव पाटील, जितेंद्र पाटील, सुरेश पाटील, नरेश ज्ञानेश्वर पाटील, पंकज पाटील तसेच समस्त पाटील (निकम) परिवार उपस्थित होता.
"झाड हेच जीवन... वृक्षारोपण हीच खरी श्रद्धांजली," हा संदेश देत उपस्थितांनी स्वर्गीय माणिकराव नामदेवराव (निकम) पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
॥ ॐ शांती ॥

No comments