adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जमीनीच्या वादात पुतण्या ने केली काकाची हत्या आरोपी अटकेत

  जमीनीच्या वादात पुतण्या ने केली काकाची हत्या आरोपी अटकेत   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  मयत काकाचा मृतदेह ना...

 जमीनीच्या वादात पुतण्या ने केली काकाची हत्या आरोपी अटकेत  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मयत काकाचा मृतदेह नाल्या शेजारी टाकून अपघातात मृत्यू झाल्याचं बनावं केल्याचा रावेर पोलिसांच्या निदर्शनास आले व सदर घटनेचा उलगडा मोठ्या कौशल्याने उघडकीस आणला ही घटना रावेर तालुक्यातील गारखेडा येथे घडली असून जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने डोक्यावर काठीने वार करून काकाचा खून केल्याची घटना पोलीस तपासात सामोरे आली.  या प्रकरणी रावेर पोलीसांनी मयताचा पुतण्या अनिल जखा बारेला रा गारखेडा याला अवघ्या काही तासांतच अटक केली आहे.सदरची घटना २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.०० वाफेच्या सुमारास घडली आहे रावेर पोलीस स्टेशनचे हद्दीतील पाल पोलीस मदत केंद्राच्या  गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६ वर्षे) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.व परिसराची पाहणी दरम्यान मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तपास चक्रे फिरवली. घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळवली. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला वय २९ वर्षे, रा. गारखेडा याचे मयतासोबत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते. याच वादाच्या रागातून दि. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता वर्ष आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या गंभीर मारहाणीत रामा थावरू बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकून दिला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने, वैज्ञानिक पद्धतीने व कौशल्यपूर्ण तपास करून हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला असुन, सदर प्रकरणी आरोपी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

No comments