adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुरुपौर्णिमेनिमित्त चुंचाळे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हजारो भाविकांची उपस्थिती; महाप्रसाद, पालखी मिरवणूक व भजन-भारुड कार्यक्रमांची जय्यत तयारी

  गुरुपौर्णिमेनिमित्त चुंचाळे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हजारो भाविकांची उपस्थिती; महाप्रसाद, पालखी मिरवणूक व भजन-भारुड कार्यक्र...

 गुरुपौर्णिमेनिमित्त चुंचाळे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

हजारो भाविकांची उपस्थिती; महाप्रसाद, पालखी मिरवणूक व भजन-भारुड कार्यक्रमांची जय्यत तयारी 


भरत कोळी यावल 

संपादक हेमकांत गायकवाड 

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चुंचाळे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी आणि श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमीत शिष्यगण परिवाराच्या वतीने हा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

देशभरातून हजारो भाविक दरवर्षी चुंचाळे येथे येऊन श्री समर्थ वासुदेव बाबा, रघुनाथ बाबा व सुकनाथ बाबा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतात. गुरु-शिष्य परंपरेचे पवित्र नाते अखंड राहावे, या उद्देशाने गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त यात्रा उत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ वासुदेव बाबा मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी काही रिक्षाचालकांकडून मंदिरापर्यंत मोफत वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासह भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे वेळापत्रक

- पहाटे ५ वाजता — मूर्ती अभिषेक

- सकाळी ६ वाजता — मारुती अभिषेक

- सकाळी ८ वाजल्यापासून — भजन, भारुड कार्यक्रम (आरतीच्या वेळा वगळता)

- दुपारी १२.३० वाजता — महाआरती

- दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत — महाप्रसाद वाटप

- सायंकाळी ७ वाजता — आरती

- सायंकाळी ५ वाजल्यापासून — पालखी मिरवणूक

- रात्री ८ वाजता — दहीहंडी कार्यक्रम

भाविकांनी महाप्रसादाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शिरपूर येथून निघालेल्या पायी दिंडीचे आगमन मंगळवार, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी चुंचाळे येथे होणार आहे. यावेळी तालुक्यातील नायगाव, किनगाव, दहिगाव, सावखेडा, गिरडगाव, वाघोदा, मनवेल, साकळी आदी भागांतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चुंचाळे परिसरात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

No comments