'१ लाखाचे १० लाख' देण्याचे आमिष; बनावट नोटा देऊन ८० हजारांची फसवणूक, दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा Ai निर्मीत काल्पनिक चित्र अमोल बा...
'१ लाखाचे १० लाख' देण्याचे आमिष; बनावट नोटा देऊन ८० हजारांची फसवणूक, दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा
Ai निर्मीत काल्पनिक चित्र
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मलकापूर : एका लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल दहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना ९ जुलै रोजी मलकापूर शहरातील चाळीसबिगा परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाशचंद गोरीलाल कुशवाह (वय ३०, रा. हराई पंचायत, निवारी, ता. छत्तरपूर बारी, मध्य प्रदेश) यांना दोन अज्ञात व्यक्तींनी एक लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडलेल्या फिर्यादीकडून आरोपींनी ८० हजार रुपये घेतले. मात्र, त्याबदल्यात त्यांनी 'बच्चो की बँक' असे लिहिलेल्या बनावट नोटांची बंडले देऊन फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अप. क्र. ५०७/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) व ३(५) अन्वये दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील करीत आहेत.
No comments