adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रेस लेखणीचा व समाजसेवेचा गुरुपौर्णिमेनिमित्त गौरव ज्येष्ठ पत्रकार किशोर रूपारेल व रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांचा सत्कार

 प्रेस लेखणीचा व समाजसेवेचा गुरुपौर्णिमेनिमित्त गौरव ज्येष्ठ पत्रकार किशोर रूपारेल व रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांचा सत्कार  पल्लवी पाटील खा...

 प्रेस लेखणीचा व समाजसेवेचा गुरुपौर्णिमेनिमित्त गौरव

ज्येष्ठ पत्रकार किशोर रूपारेल व रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांचा सत्कार 


पल्लवी पाटील खामगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव : पवित्र गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी (दि. २९ जुलै) पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. खामगावचे ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक किशोर (काका) रूपारेल तसेच समाजसेवक व रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांचा विविध ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी संघटनेचे गौरव कवटेकर व अविनाश घोडके यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार किशोर (काका) रूपारेल यांच्या लोकोपचार कार्यालयात भेट देत पुष्पगुच्छ अर्पण करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या रूपारेल यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

त्यानंतर समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देत रक्तदान चळवळ मजबूत करणारे रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांचा शासकीय रक्तपेढी, सामान्य रुग्णालय, खामगाव यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शासकीय रक्तपेढीचे वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.

याप्रसंगी सुरजभैय्या यादव म्हणाले, "रक्तदाता, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकार हे समाजाचे खरे गुरू आहेत. एकनिष्ठा फाउंडेशन व संघटनेच्या माध्यमातून आम्ही आरोग्य सेवा, रक्तसेवा आणि गौसेवा क्षेत्रात सातत्याने कार्य करत राहू."

या कार्यक्रमाला रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख, रक्तपेढी तंत्रज्ञ सौ. सपना कांबळे, अली सैय्यद, सौ. मेघा इंगळे, परिचारिका भारती काळे, कु. आंचल, कु. गायत्री, कु. अश्विनी, कु. अनुजा तसेच शासकीय रक्तपेढीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सदर माहिती रविंद्र दिपके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

No comments