adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न

  समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       भगिनी मंडळ चोप...

 समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर एक दिवसीय कार्यशाळा ही समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती.

       सदर अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेच्या अध्यक्षपदी समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर हे होते. कार्यशाळेचे उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आधीसभा सदस्य प्रा.डॉ. धीरज वैष्णव हे होते. विशेष प्रमुख अतिथी म्हणून कबचौ उमवी, जळगाव येथील समाजकार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. जगदीश सोनवणे,  प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, प्राचार्य डॉ. निलेश गायकवाड, उप प्राचार्य डॉ.आशिष गुजराथी आदी मान्यवर होते. 

        कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या दिवंगत संचालिका डॉ. सुशीलाबेन शाह उर्फ जीजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यशाळेच्या प्रास्ताविकातून डॉ. जगदीश सोनवणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला.  आधीसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव यांनी सदर कार्यशाळा ही समाजकार्याच्या सर्व अभ्यासकांना उपयुक्त असल्याचे मत नमूद केले. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी तथा प्राध्यापक - प्राध्यापकेतर कर्मचारीवृंद यांच्या संदर्भातील विद्यापीठ स्तरीय प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ यांनी समाजकार्य महाविद्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांने सांघिक भावनेतून आणि व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी समाजकार्याचा अभ्यासक्रम हा वास्तववादी, उपयुक्ततावादी आणि परिस्थिती सापेक्ष कालसुसंगत असावा. समाजकार्याची आधारशिला असावा. समाजकार्याच्या अभ्यासक्रमात सर्वच समाज घटकांचा व्यापक विचार होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

         समाजकार्याच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मानांकनानुसार आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत समाजकार्य स्नातक द्वितीय वर्ष आणि समाजकार्य पारंगत द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमावर आणि अभ्यासक्रमातील घटकांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली आणि त्याचे निश्चितीकरण करण्यात आले. याकरिता प्राचार्य डॉ. निलेश गायकवाड आणि प्रा.डॉ. दिलीप घोंगडे यांनी समिती अध्यक्ष म्हणून विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यशाळेत समाजकार्य महाविद्यालय, चोपडा, अमळनेर, मोराणे आणि तळोदा येथील बहुसंख्य प्राध्यापक सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी हे होते. 

          कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राहुल निकम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांनी केले. सदर कार्यशाळेबाबत सर्व प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.

No comments