adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जन्मभूमीच्या शाळेला शेवटच्या पगाराची सप्रेम भेट; मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांचा प्रेरणादायी आदर्श

  जन्मभूमीच्या शाळेला शेवटच्या पगाराची सप्रेम भेट; मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांचा प्रेरणादायी आदर्श  शामसुंदर सोनवणे हातेड (संपादक -:-...

 जन्मभूमीच्या शाळेला शेवटच्या पगाराची सप्रेम भेट; मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांचा प्रेरणादायी आदर्श 


शामसुंदर सोनवणे हातेड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हातेड  – जिल्हा परिषद केंद्र शाळा, हातेड येथे कार्यरत असलेले ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. पुरुषोत्तम विठ्ठलराव सोनवणे (रा. हातेड खुर्द) यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

सन १९७४ मध्ये याच जिल्हा परिषद केंद्र शाळा, हातेड येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या श्री. सोनवणे यांना तब्बल ५० वर्षांनंतर याच शाळेत सेवाकार्य करण्याची संधी मिळाली. आपल्या प्रदीर्घ ३५ वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर त्यांनी ३१ मे २०२६ रोजी याच शाळेतून सेवानिवृत्ती स्वीकारली. जन्मगावातील आणि बालपणीच्या शाळेतूनच सेवानिवृत्त होण्याचे भाग्य लाभल्याने त्यांनी अत्यंत आनंद व समाधान व्यक्त केले.

सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचा व त्यांच्या सहचारिणींचा भावपूर्ण सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. हा क्षण श्री. सोनवणे यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक व अविस्मरणीय ठरला. 


यावेळी श्री. पुरुषोत्तम सोनवणे यांनी आपल्या शेवटच्या पूर्ण पगाराची रक्कम ₹१,३७,००० जिल्हा परिषद केंद्र शाळा, हातेड यांना सप्रेम भेट म्हणून प्रदान केली. या निधीचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कासाठी, शैक्षणिक सहलींसाठी, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शाळेच्या विविध भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात यावा, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, "या शाळेने मला घडवले. आज मी जे काही आहे ते या शाळेमुळेच आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. भविष्यातही शाळेला कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास मी सदैव मदतीसाठी तयार राहीन."

श्री. पुरुषोत्तम विठ्ठलराव सोनवणे यांचा हा उपक्रम शिक्षक समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षणसंस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आदर्श अनेकांसाठी अनुकरणीय ठरेल. 

No comments