adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या रसायनावर अडावद पोलिसांची धडक कारवाई; ३० हजारांचे ६०० लिटर रसायन जप्त

  गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या रसायनावर अडावद पोलिसांची धडक कारवाई; ३० हजारांचे ६०० लिटर रसायन जप्त  चोपडा ता. प्रतिनिधी : रविंद्र कोळी...

 गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या रसायनावर अडावद पोलिसांची धडक कारवाई; ३० हजारांचे ६०० लिटर रसायन जप्त 


चोपडा ता. प्रतिनिधी : रविंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अडावद पोलिसांनी रविवारी (दि. १९ जुलै २०२६) मोठी कारवाई करत वडगाव खुर्द (ता. चोपडा) येथून गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल ६०० लिटर रसायन जप्त केले. या रसायनाची अंदाजे ३० हजार रुपये किंमत असून, एका आरोपीला रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडावद पोलिसांना वडगाव खुर्द येथील गावठाण परिसरातील नाल्याजवळ गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन गाळले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार दुपारी सुमारे ३.०० वाजता पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान शत्रुघ्न आण्णा भिल (वय ३०, रा. वडगाव खुर्द, ता. चोपडा) हा गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन गाळताना आढळून आला. घटनास्थळी तीन टाक्यांमध्ये प्रत्येकी २०० लिटरप्रमाणे एकूण ६०० लिटर रसायन सापडले. या रसायनाची एकूण किंमत ३० हजार रुपये असून पोलिसांनी ते जागीच जप्त केले. तसेच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 


याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा (मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट) कलम ६५(फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोहेकॉ संजय धनगर, पोहेकॉ विनोद धनगर व पोहेकॉ मधुकर पवार यांनी सहभाग घेतला.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ मधुकर पवार करीत आहेत.

दरम्यान, आपल्या परिसरात कुठेही बेकायदेशीर गावठी दारूची निर्मिती अथवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन अडावद पोलीस प्रशासनाने केले आहे.

No comments