फैजपूर येथे धर्मचिंतन कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धर्मचिंतन सेवाभावी ट्रस्ट...
फैजपूर येथे धर्मचिंतन कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धर्मचिंतन सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत आयोजित धर्मचिंतन कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सत्र आज श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय, फैजपूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवंताच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी मानेकर बाबा, विश्वनाथ बाबा, वाघोदेकर बाबा, पांढरीकर बाबा, राजूदादा बिडकर, कृष्णराजबाबा तसेच नगरसेविका सौ. सुनिता नेहते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी कीर्तन-प्रवचन परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत सहभागी युवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद दादा यांनी प्रभावीपणे केले. शिबिराच्या उद्देश व आयोजनाबाबतचे प्रास्ताविक राजधरबाबा पुजदेकर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीप महाराज यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक व सर्व सहभागींचे आभार मानले.
महानुभाव पंथीय युवकांमध्ये कीर्तन व प्रवचनाची परंपरा अधिक सक्षमपणे रुजावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन सत्रास साधक, युवक व भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
धर्मचिंतन सेवाभावी ट्रस्ट
धर्मचिंतन कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आयोजन समिती

No comments