adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरातील हजरत मरदान शाहवली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची नगरसेविका सुमयाबी शे कुर्बान यांची मागणी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

  फैजपूरातील हजरत मरदान शाहवली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची नगरसेविका सुमयाबी शे कुर्बान यांची मागणी  नगराध्यक्षा व मुख्याध...

 फैजपूरातील हजरत मरदान शाहवली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची नगरसेविका सुमयाबी शे कुर्बान यांची मागणी

 नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर 


इदू पिंजारी  फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या तडवी वाड्यातील हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी नगरसेविका सुमय्या बी. शेख कुर्बान यांनी फैजपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे  निवेदन सादर केले आहे.

 दि ८ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील खंडेराव वाडी व सतपथी मंदीरा ला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुमय्या शेख यांनी हजरत मदनीशाह वली बाबा दर्ग्याचाही समावेश करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हजरत मदनीशाह वली बाबादर्गा हा फैजपूर शहरातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून येथे दरवर्षी भव्य उर्स सोहळा भरतो. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. दर्ग्याचे धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

या मागणीमुळे शहरातील मुस्लिम समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, धार्मिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता नगरपरिषदेच्या आगामी सभेत या विषयावर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण फैजपूर शहराचे लक्ष लागले आहे.

No comments