adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निलंगा शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा उच्छाद.... पोलिसांनी आता धडक कारवाईच करावी...

 निलंगा शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा उच्छाद.... पोलिसांनी आता धडक कारवाईच करावी...  Ai निर्मित काल्पनिक फाईल फोटो        लात...

 निलंगा शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा उच्छाद....

पोलिसांनी आता धडक कारवाईच करावी... 

Ai निर्मित काल्पनिक फाईल फोटो 

      लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निलंगा शहरातील बसस्थानक, शाळा-महाविद्यालयांचे परिसर आणि प्रमुख रस्ते हे काही टवाळखोर युवकांसाठी अक्षरशः अड्डे बनत असल्याचे चित्र समोर येत आहे. शाळा सुरू होण्याची वेळ, भोजनावकाश आणि शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत काही युवक दुचाकींवर भरधाव फेऱ्या मारणे, सायलेंसरचा कर्णकर्कश आवाज करून दहशत निर्माण करणे, विनाकारण घुटमळणे, विद्यार्थिनींची छेड काढणे, शिट्ट्या मारणे, अश्लील हावभाव करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, अशा प्रकारांना विरोध करणारे शिक्षक, कर्मचारी किंवा नागरिक यांच्याशी उद्धटपणे बोलणे, अर्वाच्य भाषेचा वापर करणे आणि धमकावण्याचे प्रकारही घडत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थिनी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शैक्षणिक परिसराची पवित्रता धोक्यात आली आहे.

बसस्थानक हा हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दैनंदिन प्रवासाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, याच परिसरात काही समाजकंटकांकडून कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप होत आहे. अशा प्रवृत्तींना वेळेत आवर घातला नाही, तर एखादी गंभीर व दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती पालक व्यक्त करीत आहेत.

नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे शहरातील सर्व शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष गस्त पथके तैनात करण्याची, सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवण्याची, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची तसेच महिलांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

शिक्षणाच्या परिसरात गुंडगिरी आणि टवाळखोरीला कोणतीही मुभा देता कामा नये. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध पोलिसांनी केवळ समज देण्यापेक्षा कठोर आणि कायदेशीर कारवाई करून त्यांना स्पष्ट संदेश देण्याची वेळ आली आहे.

याबाबत निलंगा उपविभागाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस  अधिकारी विशालजी डुमे साहेब काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments