adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकी संघ गोडाऊन थकीत भाडे त्वरित मिळावे; महसूल आयुक्त यांचेकडे नरेंद्र भाऊ नारखेडे यांची मागणी

  शेतकी संघ गोडाऊन थकीत भाडे त्वरित मिळावे;  महसूल आयुक्त यांचेकडे नरेंद्र भाऊ नारखेडे यांची मागणी  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत ...

 शेतकी संघ गोडाऊन थकीत भाडे त्वरित मिळावे; महसूल आयुक्त यांचेकडे नरेंद्र भाऊ नारखेडे यांची मागणी 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर यावल तालुका शेतकी संघाचे शासनाकडे  गोडाऊन भाडे तत्काळ मिळावे अशी मागणी शेतकी संघाचे मा सभापती व विद्यमान संचालक नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी आज महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे कडे केली आहे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना आज फैजपूर प्रांत कार्यालयात यासंदर्भात आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन संघाने सन 2013 ते 2015 याकाळात शासकीय ज्वारी खरेदी केलेले भरड धान्य साठवणूक साठी रीतसर  नियम पूर्तता करून हे गोडाऊन भाड्याने दिलेले होते  या गोडाऊन भाड्याची रक्कम आजतागायत मिळालेली नाही याबाबत नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ही रक्कम तत्काळ मिळावी अशी मागणी केली थकीत रक्कम न मिळाल्याने सदर गोडाऊनचे मेण्टन्सची कामे प्रलंबीत आहे 

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते  थकीत भाडे रक्कम अदा करण्यासाठी शासनाकडे रकमेची मागणी केलेली असून लवकरच याबाबतचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नरेंद्रभाऊ  नारखेडे यांना आश्वासन दिले यावेळी लेखी निवेदन आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले याप्रसंगी  जी प मुख्य कार्यकारी अधिकारी सहाय्य मॅडम प्रांत अधिकारी बबनराव काकडे  व अधिकारी वर्ग नगराध्यक्ष दामिनी सराफ माजी नगराध्यक्ष निलेश राणे नगरसेवक पवन सराफ सुरज गाजरे  राहुल गुजराथी  उपस्थित होते

No comments