adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देविदास शर्मा यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कार जाहीर होनाई न्यूज व साप्ताहिक माणदेश दर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त होणार सन्मान; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

 दे विदास शर्मा यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कार जाहीर होनाई न्यूज व साप्ताहिक माणदेश दर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त होणार सन्मान...

 देविदास शर्मा यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कार जाहीर

होनाई न्यूज व साप्ताहिक माणदेश दर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त होणार सन्मान; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव 

खामगाव | प्रतिनिधी : पल्लवी पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सतिफैल परिसरातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना शर्मा यांची राज्यस्तरीय ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. होनाई न्यूज व साप्ताहिक माणदेश दर्शन यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देविदास शर्मा यांना लहानपणापासूनच आध्यात्मिक, भजन आणि समाजसेवेची विशेष आवड होती. त्यांच्या संकल्पनेतून सन २००० मध्ये ह.भ.प. गोपाल महाराज रेवस्कर (देगाव) यांच्या शुभहस्ते श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सतिफैल परिसरात गुरुपौर्णिमा उत्सवाची परंपरा सुरू झाली. गेल्या २६ वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने व निस्वार्थपणे राबविले जात आहेत.

उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांसाठी जंगलातून दुधी भोपळे आणून त्यापासून कमंडलू आकाराची जलपात्रे तयार करून दरवर्षी सुमारे ४०० ते ५०० जलपात्रांचे मोफत वाटप, सामान्य रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान, अनाथ व गरजू मुलांना कपडे, महिलांना साड्या व दिवाळीनिमित्त मिठाई वाटप, थंडीच्या दिवसांत रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर राहणाऱ्या गरजूंना ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘जल ही जीवन है’ यांसारख्या जनजागृती मोहिमा अशा अनेक सामाजिक उपक्रमांचे ते नेतृत्व करीत आहेत.

याशिवाय गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, रामनवमी, दत्तजयंती, गुरुनानक जयंती, दीपोत्सव, राजमाता जिजाऊ जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी धार्मिक व राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही मंडळाच्या माध्यमातून केले जाते.

आजपर्यंत मंडळाने चिखली, पांढरदेव, शेगाव, अमडापूर, दरेगाव, बाळापूर, सिंदखेड राजा, मेहकर, बाभुळखेड, धुळे, जालना, बामखेड, नांदुरा, मलकापूर आदी ठिकाणी ३,५०० हून अधिक भजन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले आहेत.

देविदास शर्मा यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक, धार्मिक व मानवसेवेच्या कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, या नव्या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे.

No comments