ग्रीन गोल्ड सीड्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हातेड शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
ग्रीन गोल्ड सीड्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हातेड शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रीन गोल्ड सीड्स, छत्रपती संभाजीनगर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री शिवाजी हायस्कूल, हातेड व श्री शिवाजी प्राथमिक शाळा हातेड (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
"एक रोप... समृद्ध उद्याची नवी दिशा!" या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, हरित महाराष्ट्र आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, माता, पालक, शिक्षक, विद्यार्थी व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली,
कार्यक्रमास ग्रीन गोल्ड सीड्सचे (AGM.) संदीप बाविस्कर, (RSM) प्रशांत इंगळे, (ASM) निलेश बाविस्कर आणि (SO) जितेंद्र राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभली
तसेच कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष अॅड. (तात्यासो ) सुरेश सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासो शामसुंदर सोनवणे, श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. सी. पाटील, पर्यवेक्षक पी. आर. बाविस्कर तसेच श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र अहिरे यांची शुभहस्ते उपस्थिती दिली.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमातून "एक रोप – हरित भविष्याचा संकल्प" हा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करण्यात आली असून, "हरित महाराष्ट्रासाठी... एकत्र येऊया, एक रोप लावूया!" असा संदेश आयोजकांनी दिला आहे.





No comments