घाडवेल गावातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची संघर्षमय अभ्यासाची जिद्द; मूलभूत सुविधांची तीव्र गरज अशोक कोळी घाडवेल (संपादक -:- हेमकांत ग...
घाडवेल गावातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची संघर्षमय अभ्यासाची जिद्द; मूलभूत सुविधांची तीव्र गरज
अशोक कोळी घाडवेल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घाडवेल गावात पोलीस भरती, सैन्य भरती होमगार्ड भरती, तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत आहेत. गावात स्वतंत्र सुसज्ज अभ्यासिका व व्यायाम शाळा नसल्याने एका साध्या प्रायव्हेट हॉलमध्ये रात्री उशिरापर्यंत अभ्यास सुरू असल्याचे छाया चित्र पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांकडे अभ्यासाची प्रचंड जिद्द असली तरी खुर्च्या, लाईट व्यवस्था, पंखे आणि इतर आवश्यक सुविधा नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो व सामान्य परिस्थितीतून जाणीव असल्यामुळे तरीही गावातील 35 40 मुले पोलिसात आज रोजी कार्यरत आहे. व अनेख विद्यार्थी जमिनीवर बसून तासन्तास अभ्यास करत असून, उकाडा आणि अपुऱ्या प्रकाशातही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने व चिकाटीने मेहनत घेत आहेत.
गावातील युवक-युवतींची ही जिद्द पाहता त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री (युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय) मा. रक्षाताई निखिल खडसे तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्रा श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व्यायाम शाळा अभ्यासिकेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांसह व तरुण मंडळी विद्यार्थ्यांनी केली आहे.
योग्य गावातील व्यायाम शाळा व अभ्यासिका, खुर्च्या, पंखे, एलईडी लाईट आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास या ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि पोलीस भरती,सैन्य भरती होमगार्ड, तलाठी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल.

No comments