adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गंभीर आजाराने ग्रस्त होमगार्ड रवींद्र पाटील यांना चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

गंभीर आजाराने ग्रस्त होमगार्ड रवींद्र पाटील यांना चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत  चोपडा (प्रतिनिधी): संपादक हेमकांत गायकवाड  ...

गंभीर आजाराने ग्रस्त होमगार्ड रवींद्र पाटील यांना चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत 



चोपडा (प्रतिनिधी):

संपादक हेमकांत गायकवाड 

चोपडा शहर पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असलेले होमगार्ड अधिकारी रवींद्र पाटील हे सध्या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी माणुसकीचा आदर्श जपत पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी एकत्रितपणे उपचारासाठी ₹२५,००० रुपयांची आर्थिक मदत रवींद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

रवींद्र पाटील यांनी चोपडा शहरात अनेक वर्षे होमगार्ड म्हणून विविध कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे. विशेषतः गणेशोत्सव, विविध मिरवणुका तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांतील बंदोबस्तात त्यांनी जबाबदारीने कर्तव्य पार पाडले असून त्यांच्या सेवाभावी कार्याची सर्वत्र दखल घेतली जाते.

या प्रसंगी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस दलाने दाखविलेल्या या माणुसकीपूर्ण सहकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

No comments