adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आकाशवाणी चौकात भारतीय सैन्याचा रणगाडा उभारावा; अन्यथा मनसे लोकसहभागातून उभारणार – ॲड. जमील देशपांडे

आकाशवाणी चौकात भारतीय सैन्याचा रणगाडा उभारावा; अन्यथा मनसे लोकसहभागातून उभारणार – ॲड. जमील देशपांडे जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...

आकाशवाणी चौकात भारतीय सैन्याचा रणगाडा उभारावा; अन्यथा मनसे लोकसहभागातून उभारणार – ॲड. जमील देशपांडे


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव शहरातील जनरल अरुण वैद्य चौक (आकाशवाणी चौक) येथे भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा उभारून चौकाला शौर्याचे प्रेरणास्थान बनवावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसहभागातून रणगाडा उभारण्यासाठी पुढाकार घेईल, असा इशारा मनसेने दिला आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, जनरल अरुण वैद्य हे भारतीय सैन्याच्या इतिहासातील पराक्रम, धैर्य आणि नेतृत्वाचे तेजस्वी प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण करणे ही गौरवाची बाब असली, तरी त्या चौकात त्यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभारणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे या चौकात भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले की, यापूर्वी या चौकात दोन्ही बाजूंना दोन लहान तोफा बसविण्यात आल्या होत्या. त्या पाहून नागरिकांना भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण होत असे. मात्र, सध्या त्या तोफा नसल्याने चौकाची ओळख आणि ऐतिहासिक महत्त्व कमी झाल्याचे दिसून येते.

देशातील अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सेवामुक्त रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमाने उभारून राष्ट्रप्रेम व देशभक्तीची भावना जपली जाते. जळगावसारख्या ऐतिहासिक शहरातही असे प्रेरणादायी स्मारक उभारणे ही काळाची गरज असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.

मनपा प्रशासनाने संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याशी समन्वय साधून सेवामुक्त रणगाडा उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, निधी अथवा अन्य अडचणी असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसहभागातून निधी उभारून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत रणगाडा उभारण्यासाठी पुढाकार घेईल, अशी भूमिका ॲड. जमील देशपांडे यांनी स्पष्ट केली.

"शहरातील चौक हे केवळ वाहतुकीचे केंद्र नसून शहराचा इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान जपणारी स्मारके असतात. जनरल अरुण वैद्य यांच्या नावाने असलेल्या चौकात रणगाडा उभारणे म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला जळगावकरांकडून वाहिलेली अनोखी मानवंदना ठरेल," असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments