adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जीवनातील प्रत्येक क्षण ज्ञानार्जनासाठी खर्च करा - विजय सैतवाल

 जीवनातील प्रत्येक क्षण ज्ञानार्जनासाठी खर्च करा - विजय सैतवाल  जामनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जामनेर  : येथुन जवळच असलेल्या ...

 जीवनातील प्रत्येक क्षण ज्ञानार्जनासाठी खर्च करा - विजय सैतवाल 


जामनेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जामनेर  : येथुन जवळच असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ग्रीन आर्मी प्रमुख विजय सैतवाल सर यांनी जीवनातील प्रत्येक क्षण ज्ञानार्जनासाठी खर्च करा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. गुरुपौर्णिमेनिमित्त इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना तुळशी रोपे भेट दिली. जशी तुळस चोवीस तास ऑक्सिजन देत असते तसे गुरुजन सदैव ज्ञानदानाचे कार्य करीत असतात, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस. आर शिकोकार हे होते. प्रमुख पाहुणे ए. बी. पाटील, सौ. स्मिता साळुंखे, या होत्या. गीता कोळी, वैष्णवी बोरसे, पूर्वी नानोटे , प्रियांका खवडे यांनी समयोचीत भाषणे केली. हर्षल खुरपडे धनश्री खवडे यांनी गुरुवंदना सादर केली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली पालोदे व सुत्रसंचलन मोहिनी पालवे तर आभार प्रदर्शन धनश्री खवडे हिने केले. या कार्यक्रमांसाठी जी. टी. पाटील, आर. एल. कोळी, एन. एस. पाटील, श्रीमती के आर सुरवाडे , एम. एस. जैन, व ग्रीन आर्मीचे विराज जंगले, गणेश पाटील, लक्ष्मी मुळे, प्रतिक्षा खवडे,  वैभव भोजने, भूमिका नानोटे, दुर्गा मुळे, खूशी कोळी, श्रावणी नेवल यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक गावकऱ्यांनी केले.

No comments