नाशिक विभागीय आयुक्तांकडून घरकुलांची पाहणी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून लाभार्थ्यांच्याअडी अडचणी जाणून घेत उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांना सू...
नाशिक विभागीय आयुक्तांकडून घरकुलांची पाहणी लाभार्थ्यांशी
थेट संवाद साधून लाभार्थ्यांच्याअडी अडचणी जाणून घेत उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांना सूचना!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावखेडा येथे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान सावखेडा येथील गावठाणा परिसरातील प्लॉट भागात भेट देऊन घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत घरकुल बांधकामासह इतर विविध समस्या शांतपणे ऐकून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. घरकुलांच्या गुणवत्तेची पाहणी करताना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, मूलभूत सुविधांचा अभाव तसेच प्रलंबित कामांचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला पाहिजे, यावर त्यांनी भर देत सर्व प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. लाभार्थ्यांशी थेट संवाद साधताना गेडाम यांनी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करून कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नाशिक विभागीय आयुक्तांच्या या भेटीमुळे घरकुल योजनेच्या कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा लाभार्थी व ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी रोहन घुगे, करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, प्रांताधिकारी बबनराव काकडे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक लोखंडे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दिपा जेधे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे,तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब वाळके, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल भंगाळे, खिरोदा मंडळाधिकारी अमोल चौधरी, कृषी आत्मा गटाचे माळी साहेब, जलसंधारण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक प्रशांत भोगे, तलाठी निलेश पाटील, ग्रामसेवक रतन बोदडे, सावखेडा बुद्रुकचे सरपंच युवराज कराड, सावखेडा खुर्दचे सरपंच रवींद्र बखाल, ग्रामपंचायत सदस्य, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments