जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.29 जुलै र...
जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.29 जुलै रोजी जे.ई.स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मुक्ताईनगर येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने सादर केला गेला. या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शाळेचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी सर, उप -प्राचार्या व्ही.के.शिर्के मॅडम, पर्यवेक्षके.आर. कवळे सर,व्ही.डी. बऱ्हाटे सर , एस.एम.वाढे सर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु. निहारिका जाधव या विद्यार्थिनीने केले. आपले आई-वडील शिक्षक आणि निसर्ग या गुरूंचे महत्त्व विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून केले. निसर्गातील प्रत्येक सजीव घटक आपला गुरु आहे,हे सजीव देखाव्यातून सादर करण्यात आले. आई-वडील व गुरुजनांना नृत्याविष्कार करून मानवंदना देण्यात आली. गुरु शिष्य परंपरा विषयी काही विद्यार्थ्यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी कु. समीक्षा गणेश या विद्यार्थिनी कडून आभार व्यक्त करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती आर. डी. भोळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments