adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुरुपौर्णिमा निमित्त यावल येथील व्यास मंदिरात भाविकांची सेवा; विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व काळा हनुमान मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम

 गुरुपौर्णिमा निमित्त यावल येथील व्यास मंदिरात भाविकांची सेवा; विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व काळा हनुमान मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम   भरत को...

 गुरुपौर्णिमा निमित्त यावल येथील व्यास मंदिरात भाविकांची सेवा; विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व काळा हनुमान मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम  


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त यावल शहरातील महर्षी व्यास मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. या दिवशी यावल शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून हजारो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ सुरू होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी तसेच कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि काळा हनुमान मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले.

भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, दर्शनासाठी सुव्यवस्थित रांगा लागाव्यात आणि मंदिर परिसरात शिस्त कायम राहावी यासाठी स्वयंसेवकांनी दिवसभर रक्षक व्यवस्था सांभाळली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह आलेल्या भाविकांना दर्शनासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मंदिर परिसरात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक सतत कार्यरत होते.

महाप्रसादाचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले. भाविकांना प्रेमाने व सेवाभावाने महाप्रसाद देत 'नरसेवा ही नारायण सेवा' या भावनेतून कार्यकर्त्यांनी सेवा बजावली. या सेवाभावी कार्याचे भाविकांनी मनापासून स्वागत करत स्वयंसेवकांचे कौतुक केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करत नागरिकांना मंदिरे आणि मंदिर परिसर नेहमी स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवण्याचे आवाहन केले. दर्शनासाठी येताना किंवा महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर परिसरात कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर टाळावा, निर्माल्य योग्य ठिकाणी टाकावे आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश देण्यात आला.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने धार्मिक उत्सवांबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व जपणारे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. धार्मिक सेवेसोबतच स्वच्छता, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधन यांचा समन्वय साधणारे उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. बजरंग दल तालुका सह संयोजक हेमंत बडगुजर, धनराज कोळी , संतोष कोळी,ओम चोव्हाण, रितेश माळी, श्रीहरी वाणी, पंकज चौधरी, राजेश काटकर, ईश्वर माळी, रवी आलोणे, हेमंत कोळी, वरद चिनावलकर सह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

No comments