adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी संसद निवडणूक उत्साहात संपन्न लोकशाही मूल्यांची जोपासना; विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध वातावरणात बजावला मतदानाचा हक्क

 प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी संसद निवडणूक उत्साहात संपन्न लोकशाही मूल्यांची जोपासना; विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध ...

 प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी संसद निवडणूक उत्साहात संपन्न

लोकशाही मूल्यांची जोपासना; विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध वातावरणात बजावला मतदानाचा हक्क


चोपडा  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शालेय विद्यार्थी संसद (School Parliament) प्रतिनिधी निवडणूक उत्साहपूर्ण, शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक प्रक्रियेच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रजीश बी. सर व उपमुख्याध्यापिका निखिला मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मतदान प्रक्रियेला प्रारंभ केला. मतदानादरम्यान विद्यार्थ्यांनी रांगेचे योग्य नियोजन, शिस्त आणि जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अनमोल सहकार्य केले. 


शाळेच्या निवडणूक समितीने संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. यामध्ये जनरल सेक्रेटरी, हेड बॉय, हेड गर्ल, हाऊस कॅप्टन, हाऊस व्हाइस कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन आणि व्हाइस स्पोर्ट्स कॅप्टन या विविध पदांसाठी मतदान घेण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही, नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना तसेच मतदानाचे महत्त्व याबाबत प्रभावी जनजागृती झाली. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव देणारा हा उपक्रम भविष्यात जबाबदार, जागरूक आणि आदर्श नागरिक घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments