जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे. ई. स्क...
जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान व राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी सर, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के मॅडम, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे सर, के. आर. कवळे सर तसेच एस. एम. वाढे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या राष्ट्रप्रेम, शिक्षणाविषयीची भूमिका, सामाजिक कार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. एस. पाटील सर यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

No comments