adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अण्णा हजारेंचे मौन आंदोलन वाडिया पार्क येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ सुरू..नीट पेपरफुटीवर अण्णा हजारे यांचे नगरच्या 'जंतर-मंतर' वरून केंद्राला थेट इशारा!

 अण्णा हजारेंचे मौन आंदोलन वाडिया पार्क येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ सुरू..नीट पेपरफुटीवर अण्णा हजारे यांचे  नगरच्या 'जंतर-मंतर...

 अण्णा हजारेंचे मौन आंदोलन वाडिया पार्क येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ सुरू..नीट पेपरफुटीवर अण्णा हजारे यांचे  नगरच्या 'जंतर-मंतर' वरून केंद्राला थेट इशारा!  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात तीव्रतेने उमटू लागले आहेत.दिल्लीमध्ये गेल्या २६ दिवसांपासून आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या घटनेमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अत्यंत व्यथित आणि संतप्त झाले आहेत.केंद्र सरकारच्या या दडपशाही वृत्तीचा निषेध नोंदवत अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.या निषेधार्थ त्यांनी अहिल्यानगर येथील ऐतिहासिक वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकाजवळ (पुतळा) येथे मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे.​विशेष म्हणजे,आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी वाडिया पार्क परिसराला प्रतीकात्मकरीत्या 'नगरचे जंतर-मंतर' असे नाव देण्यात आले असून, अण्णांच्या आवाहनानंतर हजारो विद्यार्थ्यांचा आणि विशेषतः तरुणींचा जनसागर या ठिकाणी लोटला आहे.​आंदोलनाला बसण्यापूर्वी अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला एक खरमरीत पत्र पाठवले आहे.या पत्रात त्यांनी सरकारच्या कारभारावर आणि लाठीचार्जच्या घटनेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे प्रश्न दडपशाहीने नाही,तर संवादाच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत.२६ दिवस रस्त्यावर बसलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होणे ही अत्यंत दुःखद आणि लाजीरवाणी बाब आहे. "पेपरफुटीसारख्या गंभीर गैरप्रकारात केवळ खालच्या स्तरावरील छोट्या कर्मचाऱ्यांवर किंवा शिपायांवर बळीचा बकरा म्हणून कारवाई करून भागणार नाही.या भ्रष्टाचारात वरच्या पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने केंद्र सरकार कोसळणार नाही! उलट,यामुळे प्रशासनात शिस्त येईल आणि इतर मंत्र्यांनाही आपापल्या खात्याचा कारभार पारदर्शकपणे चालवण्याचा एक स्पष्ट आणि खणखणीत संदेश जाईल.​अण्णा हजारे यांनी मौन आंदोलनाची हाक देताच अहिल्यानगरमधील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने वाडिया पार्कमध्ये जमा झाले. 'नगरचे जंतर-मंतर' बनलेल्या या ठिकाणी तरुण-तरुणी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन शांततेत बसले आहेत. विशेषतःमहाविद्यालयीन युवतींचा सहभाग लक्षणीय असून,भविष्यातील अंधकार दूर करण्यासाठी आणि न्यायासाठी तरुणी आक्रमकपणे या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.​दरम्यान,अण्णा हजारे यांच्या या मौन आंदोलनामुळे नीट परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्याला पुन्हा एकदा मोठे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून,आता केंद्र सरकार अण्णांच्या या पत्रावर आणि मागण्यांवर काय भूमिका घेते,याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

No comments