मनवेल येथून पायी दिंडीची खंडव्याकडे प्रस्थान धुनीवाले दादाजी दरबारातून पायी दिंडी रवाना १५० भाविकांच्या सहभाग भरत कोळी यावल (संपादक -:- ह...
मनवेल येथून पायी दिंडीची खंडव्याकडे प्रस्थान
धुनीवाले दादाजी दरबारातून पायी दिंडी रवाना १५० भाविकांच्या सहभाग
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : मनवेल येथील श्री धुनीवाले दादाजी दरबारतर्फे, दरवर्षाप्रमाणे यंदाही मनवेल ते खंडवा पायी दिंडी गुरुवारी रवाना झाली. गुरुवारी गावातून पायी दिंडीने खंडवाकडे प्रस्थान केले. भजलो दादाजी का नाम , भजलो हरहरजी का नाम या जय घोषात दिंडीचे खंडव्याकडे प्रस्थान झाली आहे दादाजी धुनीवाले भक्तगण मोठ्या उत्साहात सहभागी झाले. गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी मनवेल येथून धुनीवाले दादाजी दरबारातून खंडवा पायी दिंडी काढून पालखी नेण्यात येते गुरूवारी मनवेल येथील दादाजी दरबारातून, सकाळी ७वाजता पालखीचे पुजन उगमसिंग कोळी याच्या हस्ते पुजन करून गावात पालखी मिरवणूक काढून दिंडी मनवेल येथून खंडवाकडे रवाना झाली. भजलो दादाजी कानाम, भजलो हरहरजी का नाम.. या जयघोषात भाविकांनी पालखी सह खंडव्याकडे प्रस्थान केले. मनवेल व दगडी येथे दिंडीत सहभागी भाविकांना दुध , शिरापोहे, कचोरी समोषा देण्यात आले. तर साकळी गावात आप्पा खेवलकर , शिवचरण बडगुजर यांनी, यावल शहरातील मंदिरात राजू पाडुरंग कोळी, जगन्नाथ सदाशिव पाटील यांनी दिंडीचे स्वागत केले. दिंडीत १५०हून अधिक भाविकांचा सहभाग आहे. ही दिंडी शुक्रवारी यावल शहरातून सावदाकडे रवाना होणार आहे. २५ जुलै रोजी निरुळ येथे ,२६ जुलै रोजी अशिरगड (मध्य प्रदेश), २७ जुलै रोजी रुस्तनपुर (मध्य प्रदेश) येथे मुक्काम करून २८ रोजी दिंडी खंडवा येथे पोहचणार आहे या विडीचे मार्गावर ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत केले जात असून, फराळ आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. यावल शहरातदेखील दिंडीतील भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.

No comments