adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देवणी तालुक्यातील एकाच्या शेतात अंधश्रद्धेला खतपाणी..!!!

 देवणी तालुक्यातील एकाच्या शेतात अंधश्रद्धेला खतपाणी..!!!    लातूर, जि. प्र.(उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) देवणी तालुक्यातील विळ...

 देवणी तालुक्यातील एकाच्या शेतात अंधश्रद्धेला खतपाणी..!!!


   लातूर, जि. प्र.(उत्तम माने )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

देवणी तालुक्यातील विळेगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने संशयास्पद खड्डा करून काहीतरी पुरल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळबळ उडाली होती. मात्र, देवणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दंडाधिकारी आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळ गाठले. ४ फूट खड्डा खोदून केलेल्या तपासणीत तिथे केवळ दोन लिंबू आढळून आले. हा प्रकार जादूटोणा किंवा अंधश्रद्धेतून झाला असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमधील संशय आणि भीती दूर झाली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे व पारदर्शकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, विळेगाव येथील सर्वे नंबर २२/३ मधील शेतात दिनांक ६ जुलैच्या रात्री किंवा ७ जुलैच्या पहाटे ७ वाजेपूर्वी एका झाडाखाली अज्ञात व्यक्तीने संशयास्पद रित्या खड्डा केला होता. मंगळवारी सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार येथील शेतकरी नरसिंग नागराळे आणि उद्धव नागराळे यांच्या निदर्शनास आला. रात्रीच्या वेळी अज्ञात माणसाने शेतात ४ बाय ४ चा खड्डा करून काहीतरी गंभीर किंवा अनुचित प्रकार पुरला असावा, अशी शंका आल्याने त्यांनी तात्काळ देवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

​पोलीस व प्रशासनाची संयुक्त धाव

​तक्रारीचे गांभीर्य ओळखून देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  अनिल खोडेवाड यांनी तात्काळ लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना या प्रकरणाची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय.अनिल खोडेवाड


यांनी लगेचच देवणीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सोमनाथ वाडकर यांना पाचारण केले. नागरिकां मधील संशय दूर करण्यासाठी आणि कुठलीही अफवा पसरू नये म्हणून शासकीय पंच,फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर अमर टिळे यांच्यासह फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

​खड्ड्यातून काय निघाले?

​सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे पालन करून शासकीय पंचांसमक्ष तो संशयास्पद खड्डा ४ फूट खोल उकरून सखोल पाहणी करण्यात आली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या खड्ड्यात कोणतीही अनुचित किंवा गंभीर वस्तू आढळली नाही, तर केवळ दोन लिंबू आढळून आले. यावरून हा प्रकार निव्वळ अंधश्रद्धेतून किंवा जादूटोण्याच्या हेतूने केला गेला असल्याचे स्पष्ट झाले.

​वरिष्ठांचे मार्गदर्शन व टीमची कामगिरी

​ही संपूर्ण कामगिरी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी ढमे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  अनिल खोडेवाड, पोलीस अंमलदार लामतुरे, पुट्टेवाड, पवन गायकवाड आणि अभिजित यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.

​अफवांना पूर्णविराम

पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता, अत्यंत पारदर्शकपणे थेट घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि वस्तुस्थिती लोकांसमोर आणली. त्यामुळे गावात पसरू पाहणाऱ्या अफवांना वेळीच पूर्णविराम मिळाला. देवणी पोलिसांच्या या तत्पर कार्यपद्धतीबद्दल विळेगावच्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी पोलिसांचे जाहीर आभार मानले आहेत.

No comments